Advertisement

मुंबईत 'बायोडायजेस्टर' शौचालय


मुंबईत 'बायोडायजेस्टर' शौचालय
SHARES

धारावी - 'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत बृहन्मुंबई पालिकेद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील नागरिकांना शौचालयांची उपलब्धता करून दिली आहे. महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागाद्वारे धारावी परिसरात आणि 'शीव-माहिम लिंक रोड'वर, पर्यावरणपूरक पद्धतीच्या दोन 'बायोडायजेस्टर' शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. या शौचालयांचे लोकार्पण खासदार श्री. राहुल शेवाळे आणि स्थापत्य समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही शौचालयांची एकत्रित क्षमता ३० आसनांची आहे. 'बायोडायजेस्टर' पद्धतीवर आधारित एवढ्या मोठ्या आसन क्षमतेचे हे मुंबईतील पहिलेच शौचालय आहे.

'बायोडायजेस्टर' पद्धतीवर आधारित सार्वजनिक शौचालयातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

1.शौचालयाची सेप्टीक टँक ही 'एफ. आर. पी.' पासून बनविण्यात आली असून, टँक मध्ये जीवाणू (बॅक्टेरिया) सोडण्यात येतात. सदर जीवाणूंकडून ७२ तासात टँक मधील मैला नष्ट करुन बाहेर फक्त पाणी सोडण्यात येते.
2. हे पाणी दुर्गंधीयुक्त नसून पाण्याचा वापर बागेसाठी करण्यात येऊ शकतो.
3. शौचालयाची आसने स्टेनलेस स्टीलची असल्याने कमीत कमी पाण्याचा वापर करुन स्वच्छ केली जाऊ शकतात.
4. शौचालयात वॉश बेसीन आणि आरशाची सोय करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा