Advertisement

बाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर


बाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर
SHARES

अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आत्तापर्यंत गायब असलेल्या स्टिंग रे या माशांनी गिरगाव चौपाटीवर अचानक दर्शन देण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान काही प्रमाणात स्टिंग रे किनाऱ्यावर येत असल्यानं यंदाही गणेशभक्तांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत असून बाप्पच्या विसर्जनातही विघ्न आलं आहे.


चौपाट्यांवर स्टिंग रे चा धोका

सागरी परिसंस्था अभ्यासक आणि छायाचित्रकार प्रदीप पाताडे यांनी गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर यंदा मोठ्या प्रमाणात स्टिंग रे, जेली फिश आणि बटरफ्लाय रे मासे दिसू लागल्याची माहिती दिली आहे. यंदा पाच दिवसांच्या बाप्पांनंतर नुकतंच सात दिवसांच्या गणपतींचंही विसर्जन सुखरुप पार पडलं. मात्र त्यानंतर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक अनेक स्टिंग रे चौपाटीवर दिसू लागले. 

स्टिंग रे हे मासे एखाद्या वर्षी हे मासे मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर दिसू शकतात, तर एखाद्या वर्षी हे प्रमाण कमी असतं. याबद्दल कोणतंही निश्चित अंदाज देता येत नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.


दंश अधिक वेदनादायी

स्टिंग रेचा दंश हा अधिक वेदनादायी असतो. गेल्या काही वर्षांमध्ये स्टिंग रे हे मुंबई तसेच आसपासच्या समुद्र किनाऱ्यावर दिसत असून त्यांच प्रमाण कमी होत. या आधी २०१३ साली मोठ्या प्रमाणात स्टिंग रे किनाऱ्यावर आढळले होते. यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येने स्टिंग रे समुद्र किनाऱ्यावर आल्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत स्टिंग रेच्या पिल्लांची संख्या अधिक दिसत असून सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. प्रदीप पाताडे, सागरी परिसंस्था अभ्यासक आणि छायाचित्रकार

तसच स्टिंग रेंनी दंश करू नये यासाठी गमबूट घालणे हा उपाय घातक आहे. अनेकदा पाण्यात गेल्यावर गमबूटमध्ये पाणी जाते त्यामुळे हे मासे बुटांमध्ये शिरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी गमबूट घालणे टाळाव.


दंश झाल्यास...

  • स्टिंग रेचा दंश झाल्यास किनाऱ्यावरील प्रथमोपचार केंद्रामध्ये उपचार घ्यावेत.
  • गरम पाणी असेल तर त्याने दंशाची जागा धुवावी त्यामुळे वेदना कमी होतील.
  • त्यानंतर जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा