मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या एसी लोकल ट्रेनवर (Mumbai AC Local) दगडफेक केली. त्यामुळे अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या.
कांदिवली ते बोरिवली दरम्यान दगडफेकीची ही घटना घडली. या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नसले तरी रेल्वेच्या काचा फुटल्या.
दगडफेकीची माहिती मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान धावणाऱ्या एसी लोकल ट्रेनवर सोमवारी दुपारी दगडफेक करण्यात आली.
एसी लोकल कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान (बोरिवली-कांदिवली) पोहोचली तेव्हा त्यावर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दुपारी ३.३८ च्या सुमारास घडली.
दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्यांच्या काचा फुटल्या. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मुंबई रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा