गतिरोधक गेले वाहून

 Bandra west
गतिरोधक गेले वाहून

चेंबूर - मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे टिळक नगर, सिंधी सोसायटी, चेंबूर रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणच्या गतिरोधकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. "कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने एका महिन्याच्या पावसातच गतिरोधक वाहून गेले आहेत", असा आरोप प्रवासी  आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.

Loading Comments