कहाणी...जुन्या मुंबईची

Mumbai
कहाणी...जुन्या मुंबईची
कहाणी...जुन्या मुंबईची
कहाणी...जुन्या मुंबईची
कहाणी...जुन्या मुंबईची
कहाणी...जुन्या मुंबईची
See all
मुंबई  -  

दक्षिण मुंबई...जुनी मुंबई म्हणून या विभागाला एक वेगळीच ओळख आहे. हीच ओळख कायम टिकून रहावी यासाठी डोंगरी विभागातील लोक आटापिटा करत आहेत. या लोकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याची मोहीम हाती घेतली. 2007 साली आपला परिसर सुंदर आणि स्वच्छ राहील यासाठी हेल्प अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट(हेल्प एएलएम)च्या नावाने या परिसरातील लोकांनी कार्यक्रम राबवले. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरात मस्जिदची बाजार पेठ, प्लॅस्टिक बाजार, मसाले बाजार आणि कडधान्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे या परिसरात  घाणीचं साम्राज्य असणं स्वभाविक आहे. मात्र हा परिसर स्वच्छ रहावा म्हणून एएलएमच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. त्यातच सिमेंटचं जंगल असल्यामुळे इथे झाडही लावता येणं तसं सोप नव्हतं. मात्र येथे कुंडीत झाडं लावून हा परिसर हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.सुरुवातीला या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले होते मात्र आज या परिसराचा कायापालाट झाला आहे. यासाठी 70 टक्के लोकांचा एलएलएमला सहभाग लाभला. विशेष म्हणजे मुंबईची जुनी ओळख असलेल्या डोंगरी विभागाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेतल्याचं एएलएमचे अध्यक्ष डॉ. सय्यद उत्तानवाला यांनी सांगितले.

डोंगरीमध्ये जमात खाना आहे. ज्याला क्लॉक टॉवर म्हणून ओळखलं जातं. तो ब्रिटीश काळात बांधण्यात आला आहे. तसेच डोंगरीमध्ये 200 वर्षांहून अधिक जूनी मस्जिद, 100 वर्षांहून अधिक जुना आणि आजही कार्यरत असलेला इराणी हमाम असल्याची माहितीही सय्यद उत्तानवाला यांनी यावेळी दिली.

दरम्यान या विभागाचे सहाय्यक आयुक्त उद्यकुमार शिरूरकर यांनी या गोष्टींचे जतन केले पाहिजे असं सांगत पालिकेकडे हेरिटेज समिती आहे पण सर्व मालमत्ता खासगी मालकीच्या असल्याचं सांगत अधिकारी म्हणून काहीही करता येत नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही पालिकेकडून शक्य तेवढी मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.