जामसांडेकर मार्ग अंधारात

 Lower Parel
जामसांडेकर मार्ग अंधारात
जामसांडेकर मार्ग अंधारात
See all

लोअर परळ - रस्त्यावरचे दिवे फुटल्याने बाबाजी जामसांडेकर मार्गावरील प्रवाशांना अंधारात प्रवास करावा लागतो आहे. अंधारामुळे गुन्हे वाढण्याची भीती स्थानिकांना वाटते आहे. मात्र प्रशासन याबाबत अंधारातच आहे. या संदर्भात मनसे शाखा क्रमांक 195 चे अध्यक्ष उत्तम सांडव यांना विचारले असता 'आमच्या नगरसेविका पुन्हा तिकीट मिळतंय का, याकडे लक्ष देऊन आहेत. परंतु आपल्या पद्धतीने या दिव्यांसाठी पाठपुरवठा करतो आहे. नागरिकांना या गैरसोयींतून मुक्त करण्यासाठी वरळीच्या बेस्ट कार्यालयात तक्रार केली आहे. दोन दिवसांत चार नवे दिवे लावण्यात येणार असल्याची ग्वाही बेस्ट अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे,' असं त्यांनी सांगितलं.

Loading Comments