चरई तलावाकाठचे दिवे गायब

 Dadar
चरई तलावाकाठचे दिवे गायब

साठेनगर - गणपती विसर्जनादरम्यान पालिकेने चरई तलावाचं सुशोभीकरण केलं होतं. या वेळी तलावाभोवती विविध रंगाचे आकर्षक दिवे लावण्यात आले होते. मात्र गणपती विसर्जन संपताच तलावाभोवती लावलेले सर्व दिवे गायब झालेत. तर काही दिव्यांची तोडफोड करण्यात आलीये. तलावावर सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवासी रमेश खवले यांनी दिली. त्यामुळे महापालिकेनं सामान्य जनतेच्या पैशाची अशी वाट लावण्यापेक्षा याठिकाणी एखादा सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होते आहे.

Loading Comments