Advertisement

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल, तर महासंचालकपदी दत्ता पडसलगीकरांची नियुक्ती

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची पदोन्नती होऊन ते आता पोलिस महासंचालकपदी विराजमान होतील.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल, तर महासंचालकपदी दत्ता पडसलगीकरांची नियुक्ती
SHARES

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची पदोन्नती होऊन ते आता पोलिस महासंचालकपदी विराजमान होतील.

सतीश माथूर सेवानिवृत्त

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर आज शनिवारी 37 वर्षांच्या आयपीएस सेवेनंतर निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त असलेल्या दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाली आहे. तर पडसलगीकरांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ४१वे पोलीस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे.

कोण आहेत सुबोध जयस्वाल? 

1985 च्या बॅचचे अधिकारी सुबोध जयस्वाल सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ते तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे तपास अधिकारीही होते. याशिवाय 2006 मध्ये बॉम्ब स्फोटाच्या तपास पथकातही ते कार्यरत होते. पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबईत दाखल होत त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा