रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडचे (आरकॉम)अध्यक्ष अनिल अंबानी यांना थकबाकी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे. ४ आठवड्यात थकबाकीचे पैसे न भरल्यास कारावासाच्या शिक्षेला सामोरं जावं लागेल असा आदेश न्यायालयानं दिला आहे. एरिक्सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आरकॉमच्या अध्यक्षांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्याची तक्रारही त्यांनी केली होती. तत्पूर्वी, कोर्टानं आपल्या आदेशात अंबानींना ५५० कोटी रुपयांची थकबाकी फेडण्यास सांगितलं होतं. मात्र थकबाकीचे पैसे अंबानीच्या कंपनीनं अद्याप भरले नाहीत.
अंबानींच्या या कंपनीवर सध्या सुमारे ४७ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. एरिक्सन इंडियानं केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान थकबाकीची ५५० कोटी रुपयांची रक्कम अनिल अंबानी यांना ४ आठवड्यात देण्याचे आदेश दिले होते. मात्र अंबानी यांच्या कंपनीनं अद्याप थकबाकीची रक्कम याचिकाकर्त्या कंपनीला दिली नाही. कोर्टानं त्यांना चार आठवड्यांत हे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. पैसे न दिल्यास कंपनीचे मालक अनील अंबानीसह कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना तीन महिन्यासाठी अटक होऊ शकते. न्यायमूर्ती आर एफ नरीमन आणि विनीत सरन यांच्या न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.
हेही वाचा