जुन्या नोटा असतील तर, जुलैपर्यंत सांभाळून ठेवा

  Mumbai
  जुन्या नोटा असतील तर, जुलैपर्यंत सांभाळून ठेवा
  मुंबई  -  

  lतुमच्याकडे 500 आणि एक हजाराच्या जुन्या नोटा असतील तर त्या सांभाळून ठेवा, कारण या नोटा बदलण्याची मुदत वाढवण्याच्या मागणीच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात जुलैमध्ये सुनावणी होणार आहे. एका याचिकाकर्त्याने सुनावणीच्या दरम्यान म्हटले की, त्यांना याबाबत  केंद्राकडून शपथपत्राची प्रत मिळाली नसल्याने या याचिकेवरील सुनावणी टाळावी. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला युक्तीवाद करायला सांगितलं, मात्र नंतर या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली.

  या सुनावणीच्या दरम्यान केंद्र सरकारने म्हटलं की, याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत वेगवेगळे जबाब नोंदवू शकत नाही. तसेच चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जनतेला बँकेत जमा करू द्याव्यात की नाही, हे न्यायालयाने ठरवावं. त्यावर न्यायालयाने देखील संमती दर्शवली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.