Advertisement

'स्वास्थ भारत यात्रा' 10 नोव्हेंबरला पोहचणार मुंबईत


'स्वास्थ भारत यात्रा' 10 नोव्हेंबरला पोहचणार मुंबईत
SHARES

इट राईट इंडिया आणि इट हेल्दी, इट सेफ, इट फॉरटीफीड (fortified) असं म्हणत केंद्र सरकारने 'स्वास्थ भारत यात्रा' अभियान सुरू केलं आहे. नागरिकानी चांगलं खावं आणि त्यांचं आरोग्य स्वस्थ रहावं यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? यासाठी जनजागृती करण्यासाठी १६ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर दरम्यान देशभर स्वास्थ भारत यात्रा होणार आहे.

IMG-20181012-WA0013.jpg

१० नोव्हेंबरला मुंबईत

सायकलीवरून होणारी ही यात्रा १० नोव्हेंबरला मुंबईत पोहचणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली आहे. तर मुंबईत ही यात्रा पोहोचल्यानंतर मुंबईत जनजागृतीचे अनेक कार्यक्रम होणार असून मुंबईकरांनी यात सहभागी होत स्वस्थ आरोग्याचा मंत्र जाणून घ्यावा, असं आवाहनही दराडे यांनी केलं आहे.

IMG-20181012-WA0011.jpg

'स्वास्थ भारत यात्रा' अभियान

भारतीयांमध्ये अजूनही अन्न साक्षरता अर्थात काय खावं, कसं खावं, सुरक्षित अन्न याबाबत जनजागृती नाही. त्यामुळे भारतीयांमध्ये अनेक आजार बाळावल्याचं चित्र आहे. हेच बदलत प्रत्येकामध्ये अन्न साक्षरता रुजवण्यासाठी 'स्वास्थ भारत यात्रा' अभियान हाती घेण्यात आलं आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने हाती घेण्यात आलेल्या या अभिमानातील यात्रेला १८ ऑक्टोबर पासून देशभरातील सहा ठिकाणीहुन सुरुवात होणार आहे.


अन्न साक्षरतेचा संदेश

सहा ट्रॅक वरून प्रत्येकी २५ प्रमाणे १५० सायकलस्वार देशभ्रमंती करत अन्न साक्षरतेचा संदेश पोहोचवणार आहेत. तर या यात्रेचा शेवट दिल्लीत होणार आहे. या यात्रेदरम्यान जनजागृतीच्या दृष्टीने कार्यक्रमाची मोठी रेलचेल असणार आहे.
अशी ही यात्रा पणजी वरून १० नोव्हेंबरच्या रात्री मुंबईला पोहचणार आहे. तर ११ नोव्हेंबरला मुंबईतील चेंबूर, मानखुर्द आणि माटुंगा अशा तीन ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम करत १२ नोव्हेंबरला ही यात्रा पुढे प्रस्थान करेल, असंही दराडे यांनी सांगितलं आहे.


अभियानाचा शुभारंभ

या अभियानाचा राज्यातील शुभारंभ गुरुवारी बीकेसीतील एमसीए इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. यावेळी ही यात्रा यशस्वी करू, असा दावा बापट यांनी केला. दरम्यान राज्याच्या इतर जिल्ह्यातुन ही यात्रा जाणार असल्यानं एफडीएकडून राज्यभर ही यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचंही बापट यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा