Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

पाळणाघर होणार सुरक्षित?


SHARES

मुंबई - नवी मुंबईमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. हा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि पाळणा घरातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पण, आता अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतलाय. पाळणाघरांवर नियंत्रण आणणे हा मुख्य उद्देश या मार्गदर्शक तत्वांच्या मागे असणार आहेच. पण पाळणाघरात मुलांना आनंदी वातावरण मिळावं आणि पालकांना आपलं मुल आनंदात आहे याची शाश्वती मिळावी यादृष्टीने मार्गदर्शक तत्वांची आखणी केली जाणार आहे. मार्चपर्यंत ही मार्गदर्शक तत्वं तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून ही मार्गदर्शक तत्वं लागू केली जातील आणि यामुळे नवी मुंबईसारख्या घटनांना आळा बसायला मदत होईल, असा विश्वास यानिमित्ताने का होईना व्यक्त होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा