Advertisement

स्विगी, झोमॅटो, ओला, उबेरनं थकविलं ३.६ कोटींचं इ-चलान

मुंबईत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

स्विगी, झोमॅटो, ओला, उबेरनं थकविलं ३.६ कोटींचं इ-चलान
SHARES

मुंबईत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार, मुंबई वाहतूक पोलिसांनी थकीत इ-चलान वसुलीची मोहीम सुरू केली असून, ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांकडून वसुलीला सुरूवात केली आहे. थकीत इ-चलानबाबत कंपन्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी डिलिव्हरी ॲप कंपन्यांकडं एकूण ३.६ कोटींचं इ-चलान थकलं आहे. यात सिग्नल मोडणे, नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग, वाहन चालविताना फोनवर बोलणं या व अन्य कारणांचा समावेश आहे.

उबेरचा १.२१ कोटी, तर ओला चालकांचा ६० लाख दंड आहे, तर  फूड डिलिव्हरी देणाऱ्या झोमॅटोच्या चालकांनी सिग्नल मोडणं, नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग, वाहन चालवताना फोनवर बोलणं, वन-वे लेनमधून गाडी चालवणं या नियमांचं उल्लंघन केलं आहे. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, स्वीगीच्या वाहनचालकांचं १.४८ आणि झोमॅटो वाहनचालकांचं ३१ लाख रुपयांचे इ-चलान थकलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ३१९ कोटींचं इ-चलान थकलं असून, वाहतूक पोलिसांच्या कॉल सेंटरद्वारे लोकांना इ-चलान भरण्यास सांगितलं जात आहे. स्विगी, झोमॅटो, ओला, उबेरच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या नावानं चालविल्या जाणाऱ्या वाहनांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं असून, त्याचं इ-चलान थकीत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा