Advertisement

मुंबईतील प्राण्यांच्या यातनांना ‘टाटा’


मुंबईतील प्राण्यांच्या यातनांना ‘टाटा’
SHARES

परळमधील बैल घोडा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या जोडीला मुंबईत आणखी एक पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथील महापालिकेच्या भूखंडावर हे पशु वैद्यकीय रुग्णालय उभं राहणार असून 'टाटा'च्या मदतीने ३०० ते ४०० कॅबिन्सचं हे रुग्णालय बांधलं जाणार आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट(एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या रुग्णालयाची उभारणी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील भटक्या तसेच पाळीव प्राण्यांची यातनांतून सुटका होणार आहे.


कुठे आहे जागा?

मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५. ४० चौ मीटरचा भूखंड आहे. या भूखंडावर हे रुग्णालय बांधलं जाणार आहे. सध्या या भूखंडावर श्वान नियंत्रण कार्यालय आहे. 'वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज' या संस्थेच्यावतीने हे केंद्र चालवलं जात आहे. पशुवैद्यकीय रुग्णालय उभारणी प्रकल्प प्रचंड गुंतागुंतीचा व मोठ्या खर्चाचा असल्याने चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट, नोंदणीकृत शासकिय संस्था, सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टही पात्र ठरली आहे. या संस्थेला ३० वर्षांच्या कालावधीकरिता हे रुग्णालय चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.



किती मजल्यांचं रुग्णालय?

बांधा, वापरा, आणि हस्तांतरित करा या तत्वावर या जागेवर या पशु वैदयकीय रुग्णालयाची उभारणी या संबंधित संस्थेच्यावतीनं केली जाणार आहे. यामध्ये जमिनीची मालकी ही महापालिकेचीच राहणार आहे. यामध्ये एकही पैसा महापालिकेच्यावतीनं खर्च केला जाणार नाही. ५ मजली या इमारतीची उभारणी संबंधित संस्था करणार असल्याची माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ योगेश शेट्ये यांनी दिली.

संसर्गजन्य आजारांबाबत महिती आवश्यक असल्यास महापालिकेकडे ठोस यंत्रणा उपलब्ध नाही. आणि खासगी पशुवैद्यकांकडून माहिती उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत महापालिकेचं स्वत: चं अद्ययावत व सुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालय असणं आवश्यक आहे. त्यामुळे या रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शेट्ये यांनी स्पष्ट केलं.


काय असणार हॉस्पिटलमध्ये?

  • ३०० लहान जनावरांसाठी ओपीडी
  • शल्य चिकित्सा कक्ष अर्थात सर्जिकल वॉर्ड
  • अपघात आणि आपत्कालीन कक्ष
  • आयसीयु आणि आयसीयू सुविधा
  • त्वचा आजार कक्ष
  • ओपीडी मेडिसीन
  • एमआरआय
  • डायलिसीस सेंटर
  • सोनोग्राफी
  • रक्तपेढी


  • पशु गणनेनुसार मुंबईतील एकूण पाळीव प्राणी: १ लाख ९५ हजार ४४८
  • पाळीव कुत्र्याची संख्या: ३५ हजार ५७२
  • २०१४ च्या गणनेतील कुत्र्यांची संख्या: ९५ हजार १७४
  • नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्या: ६९ हजार २३९
  • नसबंदी न झालेल्या कुत्र्यांची संख्या: २५ हजार ९३३
  • मुंबईत सध्या असलेले भटके कुत्रे: सुमारे १ लाख
  • पाळीव कुत्र्यांची सध्याची संख्या: सुमारे ७० ते ८० लाख
  • मुंबईतील पाळीव प्राण्याचे दवाखाने: सुमारे २००



हेही वाचा-

सायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसान

'लोअर परळचा पूल बंद करा', आयआयटी मुंबईचा 'परे'ला सल्ला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा