Advertisement

'या' ११ उपनगरीय रुग्णालयातल्या अग्निशमन यंत्रणांमध्येच दोष


'या' ११ उपनगरीय रुग्णालयातल्या अग्निशमन यंत्रणांमध्येच दोष
SHARES

मुंबईतील सर्व रुग्णालयं आणि मॉल्ससह शॉपिंग सेंटरमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणं बंधनकारक करण्यात येत असलं तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बसवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणांमध्येच तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे जोगेश्वरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरसह अनेक उपनगरीय रुग्णालयांना मुंबई अग्निशमन दलानं अद्यापही ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांची अग्निसुरक्षा ही रामभरोसे असून स्वत: महापालिका अग्निसुरक्षेचे काटेकोरपणे पालन करत नसल्याची बाब समोर आली आहे.


अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याची मागणी

मुंबईत सध्या आगीच्या दुघर्टना वारंवार घडत असून रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची संख्या विचारात घेता सर्वप्रकारच्या रुग्णालयांसह नर्सिंग होम्स, दवाखान्यांमध्येही अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याची मागणी होत आहे.

मुंबई अग्निशमन दलानेही रुग्णालये, प्रसुतीगृहांमध्ये अशाप्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवणं बंधनकारक केलं आहे. परंतु, महापालिकेची केईएम, शीव आणि नायर तसेच कुपर आदी प्रमुख रुग्णालयांसह इतर महापालिका उपनगरीय रुग्णालयांमध्ये मुंबई अग्निशमन दलाची एनओसीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


तरीही एनओसी नाही

अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली असली तरी त्यामध्ये त्रुटी असल्यामुळे या रुग्णालयांना मुंबई अग्निशमन दलाकडून एनओसी अद्याप दिलेली नाही. तर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या २९ प्रसुतीगृहे आणि ५ विशेष रुग्णालयांतर्गत सध्यस्थितीत एकूण ४०० अग्निशमन यंत्रणा असल्याचीही महिती प्रशासनानं दिली आहे.


अग्निशमन यंत्रणेत त्रुटी

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह वांद्रे के. भी. भाभा, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, भगवती रुग्णालयातील एनटीसी विभाग आदींना मुंबई अग्निशमन दलाकडून एनओसी प्राप्त झालेली आहे. मात्र उर्वरीत रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणेमध्ये त्रुटी आहेत.

भाजपा नगरसेविका प्रियंका प्रफुल्ल मोरे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयं, रुग्णालयं, प्रसुतीगृहं आणि दवाखान्यांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याची सूचना केली होती. त्यावर प्रशासनाने लेखी स्वरुपात उत्तर दिलं. त्यामध्ये प्रशासनानं प्रमुख रुग्णालयं वगळून उर्वरीत ११ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणांमध्ये त्रुटी असल्याचं मान्य केलं आहे.


यंत्रणांमध्ये त्रुटी

कुपर रुग्णालय इमारतीला अग्निशमन दलाची एनओसी प्राप्त झाली असली तरी निवासी वैद्यकीय अधिकारी यांचं निवासस्थान आणि परिचारिका निवासस्थान यासह प्रशिक्षण केंद्र या आदी ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात यंत्रणा बसवली असली तरी त्यामध्ये त्रुटी आहे. त्यामुळे या रुग्णालयालाही फायरची एनओसी प्राप्त झालेली नाही. तर उर्वरीत दहा रुग्णालयांमध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं त्रुटी लक्षात आणून दिल्या आहे. त्याची पूर्तता न झाल्यामुळे ही एनओसी प्राप्त झालेली नसल्याचं म्हटलं आहे.


'या' रुग्णालयांना फायर एनओसी नाही

  • जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालय
  • बोरीवली पूर्व सावित्रीबाई फुले रुग्णालय
  • गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ रुग्णालय
  • मालाड पूर्व म. वा. देसाई रुग्णालय
  • सांताक्रूझ पूर्व व्ही. एन. देसाई रुग्णालय
  • घाटकोपर पश्चिम संत मुक्ताबाई रुग्णालय
  • गोवंडी शताब्दी अर्थात पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय
  • घाटकोपर पूर्व राजावाडी रुग्णालय
  • चेंबूर दिवालीबेन मेहता अर्थात माँ हॉस्पिटल
  • कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय
  • मुलुंड स्वा. वि. दा. सावरकर रुग्णालय
  • विक्रोळी क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा रुग्णालय
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा