Advertisement

मुंबईच्या तापमानात वाढ


मुंबईच्या तापमानात वाढ
SHARES

मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील तापमानात अधिक वाढ होत आहे. मुंबईत मंगळवारी यावर्षातील सर्वाधिक ३५.३ अश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर गुरुवारी मुंबईत ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी मुंबईचं तापमान ३४.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. वर्षांच्या सुरुवातीच्या २ आठवड्यातच तापमानात मोठी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना जानेवारी महिन्यात एप्रिलच्या दाहकता सहन करावी लागत आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनं बुधवारी सर्वोच्च ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जे सामान्यपासून जवळपास ४ अंश सेस्लिअस जास्त होतं.

मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोवा क्षेत्र पावसामुळे जास्त प्रभावित झाले. मात्र, या आठवड्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज स्कायमेटरनं वर्तवला आहे. या आठवड्यात कोकण-गोवा पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वातावरण पूर्णपणे स्वच्छ असण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा