मुंबईत पुन्हा गारवा

पुढील तीन दिवस तापमानात आणखी घसरण होणार असून मुंबईत पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवणार आहे.

SHARE

गेल्या दोन दिवसांपासून थोडा उकाडा जाणवत असलेले मुंबईकर गुरुवारपासून पुन्हा एकदा गारठले आहेत. गुरुवारी संध्याकाळपासून तापमानात घसरण सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी देखील थंडीचा जोर कायम होता. पुढील तीन दिवस तापमानात आणखी घसरण होणार असून मुंबईत पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवणार आहे.

मुंबईवरील वारे उत्तर ते वायव्य पट्ट्यातून वाहत असल्यानं गुरुवारपासून पुन्हा एकदा गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सियस दरम्यान नोंदवण्यात आलंय. सांताक्रुझमध्ये किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २७.३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. सामान्य तापमानाच्या सरासरीपेक्षा ३.६ अंशानं तापमानात घसरण झाली आहे


संबंधित विषय
ताज्या बातम्या