Advertisement

यंदाच्या उन्हाळ्यात तापमान अधिक वाढणार

मागील काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमान अधिक वाढणार
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात सकाळी थंडी, दुपारी उकाडा आणि रात्री पुन्हा थंडी असं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, वातावरण बदल होत असले तरी मुंबईकरांना आता हळुहळू उकाडा जाणवू लागलाय. अशातच यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षी अधिक वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदाच्या उन्हाळ्याचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागानं मंगळवारी जाहीर केले. यानुसार कोकण, घाट प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता नाकारता येणार नसल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

कोकण व घाट प्रदेश या भागातील किमान तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ६५ ते ७५ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ६५ टक्के आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा येथे तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे.

कमाल तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता कोकण, घाट आणि उत्तर महाराष्ट्रात ३५ ते ६५ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. 

राज्याच्या एकूण वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरीसारख्या स्थितीची शक्यता नाकारता येणार नाही, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या पूर्वानुमानानुसार कोकण आणि घाट भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ही शक्यता उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात ही शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा