Advertisement

ठाण्यात COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ, चाचण्या वाढवल्या

सध्या ठाणेमध्ये दररोज ५ हजार ६०० पेक्षा जास्त लोकांची तपासणी करत आहोत.

ठाण्यात COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ, चाचण्या वाढवल्या
SHARES

कोरोनव्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सोमवारी COVID 19 १ हजार ३४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

प्रशाससकिय प्रमुख डॉ. विपिन शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सध्या ठाणेमध्ये दररोज ५ हजार ६०० पेक्षा जास्त लोकांची तपासणी करत आहोत. तुलनेत मार्च ते जून या कालावधीत १ हजार ५०० लोकांच्या कोरोना चाचण्या दररोज करण्यात यायच्या. सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी १५० टीम सक्रिय आहेत. ज्यात ३ हजार ५०० आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. 

जिल्ह्यातही रविवारी, ११ ऑक्टोबरला ३२ रुग्ण मरण पावले होते. कल्याण शहरातून आतापर्यंत सर्वाधिक ४६ हजार १८५, ठाणे शहर ४० हजार ८६१ आणि नवी मुंबई इथं ४० हजार ३४५  अशी नोंद झाली आहे. 

दरम्यान, यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असं प्रतिपादन केलं की, सरकार राज्यात लॉकडाउनचे नियम हळूहळू शिथिल करत आहे. नोव्हेंबर २०२० अखेर ते लागू होईल. त्यांनी पुढे सांगितलं की, लॉकडाऊन संबंधित इतर निर्बंधही लागू होऊ शकतात. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात थांबलेल्या राज्यातील आपली सर्व कामे पुन्हा सुरू करण्यास राज्यातील सर्व क्षेत्रांची उलाढाल होईल.



हेही वाचा

विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मोहीम, पहिल्याच दिवशी ८ लाखांचा दंड वसूल

Philately Day : टपाल तिकिटांचे प्रिंट असलेल्या मास्कचं प्रकाशन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा