Advertisement

बंदचा फटका, गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यास नकार


बंदचा फटका, गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यास नकार
SHARES

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ३ दिवसीय संपाच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. या संपात सरकारी रुग्णालयातील कर्मचारीही संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच बुधवारी सकाळी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल करून न घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला.


नेमकं काय झालं?

सुनीता मासमारे (३८) असं या महिलेचं नाव आहे. या आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शहापुरच्या रुग्णालयात २ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी त्याच ठिकाणी एका शिबिरात सुनीता यांची प्रसूती होणार होती. पण रात्रीच त्यांना पोटात दुखू लागल्याने त्यांचे पती सुनील यांनी उपस्थित नर्सला याबाबत सांगितलं. मात्र तिथं डाॅक्टर उपलब्ध नसल्याने नर्सने सुनीता यांना ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला त्यांच्या पतीला दिला.


डाॅक्टरांकडून नकार

त्यानुसार सुनील यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता ठाणे येथील सामान्य रुग्णालयात त्यांच्या पत्नीला नेलं. पण तेथील कर्मचाऱ्यांनी सुनील यांना संपाचं कारण देत सुनीता यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर सुनील यांनी खाजगी गाडी करून आपल्या पत्नीला कळव्याच्या रुग्णालयात दाखल केलं. इथं त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं सुनील यांनी संगितलं.

मात्र या संपामुळं सुनील आणि त्यांच्या पत्नीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रात्रीपासून प्रसूती कळा सुरु झाल्यावरही त्यांना उपचारांसाठी अक्षरश: भटकावं लागलं.



हेही वाचा-

सरकारी कर्मचारी संपावर, मंत्रालयात शुकशुकाट

सरकारी कर्मचाऱ्यांनो, संपावर गेलात तर 'मेस्मा'; सरकारचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा