Advertisement

ठाणे महापालिकेत २ अग्निशमन गाड्या दाखल, ४५ मजल्यापर्यंतची आग विझवता येणार

ही दोन्ही वाहने रुस्तमजी अर्बनिया प्रकल्पाचे उपाध्यक्ष मधुसूदन नारायण तसेच रुस्तमजी अर्बनियाचे अग्नि आणि सुरक्षाप्रमुख सुवेक साळणकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

ठाणे महापालिकेत २ अग्निशमन गाड्या दाखल, ४५ मजल्यापर्यंतची आग विझवता येणार
SHARES

ठाणे शहरात आता 45 मजल्यापर्यंत लागलेली आग विझवता येणार आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने (एचआरएफएफव्ही) सामील झाली आहेत.रु स्तमजी अर्बनियाच्या टीमने स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेला ही दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने भेट दिली आहेत.

ही दोन वाहने उंच इमारतीत लागलेली आग वीजवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. वाहनात असलेले विशेष अग्निशमन इंजिन उच्च दाब पंपाच्या  मदतीने ४५ मजल्यांपर्यंत आग विझवू शकतील आणि दुसऱ्या वाहनात १० हजार  लिटर पाण्याच्या टाकीची क्षमता असेल. ही दोन्ही वाहने रुस्तमजी अर्बनिया प्रकल्पाचे उपाध्यक्ष मधुसूदन नारायण तसेच रुस्तमजी अर्बनियाचे अग्नि आणि सुरक्षाप्रमुख सुवेक साळणकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के, संजय भोईर, अशोक वैती, शानू पठाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झलके यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा