Advertisement

रस्त्यावरची बत्ती गूल


रस्त्यावरची बत्ती गूल
SHARES

माहिम पश्चिम येथील चर्च पेडररोड विभागातील रस्त्यावर सध्या अंधार पसरला आहे. याचे कारण आहे पेडर रोड परिसरातील रस्त्यावरची बत्ती गेल्या काही दिवसांपासून गूल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील रस्त्यावर लाईट नसल्याने येथील  रहिवासी त्रस्त झाले आहेत. पण बेस्ट प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या रस्त्यावरील लाईट बंद आहे तो माहिमचा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावरिल दिव्यांची  देखरेख बेस्ट विभागाकडून केली जाते. विशेष म्हणजे याबाबत बेस्ट प्रशासनाला तक्रार देऊनही याकडे लक्ष दिले गेलेले नाही. शिवाय रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील अंधारामुळे त्रास होत आहे. एकीकडे मुंबईमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र मुंबईच्या काही रस्त्यांवर ही परिस्थिती पहायला मिळत आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी इरफान मच्छीवाला यांनी बेस्ट विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. पण आजतागायत त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बेस्ट विभागाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बंद पडलेल्या पोलचे नंबर पुढील प्रमाणे

एसटीआर 7/16, एसटीआर 7/17, एसटीआर 7/18, एसव्हीएस 242/1 , 242/6, 242/7, 242/8, एलजीएम 129/6, 132, 136, 138, एमएमसी 6/13 , 11/2 या पोलवरील लाईट बंद आहेत.

या संदर्भात बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोपणे यांच्याशी संपर्क साधला असता रोड लाईटचे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही असे सांगत त्यांनी हात झटकले. त्याचबरोबर त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीचा नंबर दिला. परंतु अनेकदा संपर्क साधून देखील त्यांचा फोन बंदच होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा