Advertisement

अखेर मीरा भाईंदरमधून 'बांग्लादेश' हटवला, विरोधानंतर MBMC ला आली जाग

भाईंदर (Bhayandar) शहरातील एका बस स्टॉपचे नाव 'बांगलादेश' ठेवण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.

अखेर मीरा भाईंदरमधून 'बांग्लादेश' हटवला, विरोधानंतर MBMC ला आली जाग
SHARES

मुंबईलगत असलेल्या भाईंदर (Bhayandar) शहरातील एका बस स्टॉपचे नाव 'बांगलादेश' (Bangladesh) ठेवण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. मीरा भाईंदर महानगर पालिकेनेच (Mira bhayandar) हा कारनामा केल्याचे उघड झाले होते. 

सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर मीरा भाईंदर पालिकेने अखेर चुक दुरुस्त केली आहे. आता या बसस्टॉपचे मुळ नाव इंदिरा नगर असेच ठेवण्यात आले आहे. 

मीरा भाईंदरमधील बसस्टॉपचे नाव बदलण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला होता. भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन चौकातील परिसरात असलेल्या बस स्टॉपला बांग्लादेश हे नाव देण्यात आले. 

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे (MBMC) अधिकारी झोपेतून जागे झाले आणि महानगरपालिकेशी संबंधित सर्व कागदपत्रांमध्ये मूळ नाव इंदिरा नगर पुनर्संचयित करण्यासाठी दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली.

उत्तनमधील डोंगरी गावाजवळील चौकातील बांग्लादेश असे नाव देणारा मार्ग क्रमांक एकवरील बस स्टॉपचा खांबही हटवण्यात आला आहे. 

“आमच्या निदर्शनास ही चुक आल्यानंतर आम्ही ताबडतोब बांग्लादेश हे नाव हटवण्याची आणि मूळ नाव टाकण्यासाठी पावले उचलली जी येत्या दोन ते तीन दिवसांत आमच्या सर्व अधिकृत नोंदींमध्ये लागू होईल.” महापालिका उपायुक्त (कर) संजय शिंदे यांनी याची पुष्टी केली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (सार्वजनिक वाहतूक) - अनिकेत मानोरकर यांनी देखील सांगितले की त्यांनी लवकरात लवकर मूळ नाव पुनर्संचयित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे ठिकाण पूर्वी इंदिरा नगर या नावाने ओळखले जात होते जे काही वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांनी बदलले होते. मच्छीमार समुदाय या वस्तीत राहत असून एकही अवैध स्थलांतरित वस्तीत राहत नाही, असा दावा स्थानिकांनी केला.



हेही वाचा

मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी ज्युनियर इंजिनियरच्या कानशिलात लगावली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा