Advertisement

नायर रुग्णालयामधील ‘त्या’ एमआरआय मशीनच्या दुरुस्तीचा खर्च ९४ लाख


नायर रुग्णालयामधील ‘त्या’ एमआरआय मशीनच्या दुरुस्तीचा खर्च ९४ लाख
SHARES

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये खेचला गेल्याने झालेल्या अपघातात राजेश मारू या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. परंतु यामध्ये एमआरआय मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. या मशीनच्या दुरुस्तीसाठी तब्बल सुमारे ९४ लाखांचा खर्च येणार आहे. एमआरआय मशीनच्या या दुरुस्तीचं काम फिलिप्स कंपनीच्या वतीनं केलं जाणार आहे.


फिलिप्स कंपनीशी होता करार

नायर रुग्णालयात २८ जानेवारी २०१८ रोजी एमआरआय सेंटरमध्ये रुग्णासोबत ऑक्सिजनचा बाटला सोबत घेऊन गेलेला राजेश मारू या तरुणाला चुंबकीय शक्तीद्वारे एमअारअाय मशीनमध्ये खेचले गेले. यामध्ये या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला होता. या दुघर्टनेत एमआरआय मशीन नादुरुस्त झाल्यामुळे याची दुरुस्ती करण्यासाठी फिलिप्स इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला कळवण्यात आले. ही मशीन या कंपनीकडून खरेदी करण्यात आल्यामुळे तसेच याच्या देखभालीचं कंत्राट करार या कंपनीशी करण्यात आल्यामुळे या कंपनीला पाहणी करण्यास सांगितलं होतं.

इतका येणार खर्च

त्यानुसार या कंपनीनं एमआरआय मशीनच्या स्पेअर पार्टसाठी ५६ लाख ६७ हजार ४२४ रुपये, सर्विस अॅक्टिव्हिटीचा खर्च २३ लाख ६० हजार रुपये तसेच हेलियम भरण्याचा खर्च १३ लाख ७९ हजार १८४ रुपये अशाप्रकारे एकूण ९४ लाख ०६ हजार ६०८ रुपये इतका खर्च या मशीनच्या दुरुस्तीसाठी येणार आहे. त्यामुळे या कंपनीकडून मशीनची दुरुस्ती करून पुढील एक वर्षासाठी देखभाल करण्याकरिता या कंपनीला ५९ लाख २७ हजार १२८ रुपये वार्षिक देखभालीचं कंत्राट देण्यात येणार आहे.


१० वर्षांपूर्वी केली होती खरेदी

नायर रुग्णालयातील ही एमआरआय मशीन २००८मध्ये खरेदी करण्यात आली. ३ वर्षांचा हमी कालावधी व पाच वर्षांचा देखभाल करार अशाप्रकारे ७ कोटी ८९ लाख २८ हजार ८१३ एवढ्या किंमतीत या मशीनची खरेदी केली होती.


हेही वाचा -

नायर एमआरआय प्रकरण - आया आणि वॉर्डबॉय दोषी

सरकारी रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीनची कमतरता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा