नायर एमआरआय प्रकरण - आया आणि वॉर्डबॉय दोषी


नायर एमआरआय प्रकरण - आया आणि वॉर्डबॉय दोषी
SHARES

नायर रुग्णालयात एमआरआयमध्ये अडकून राजेश मारू यांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी यासाठी मुंबई महापालिकेने चौकशी समिती नेमली होती.

आता त्या समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणात रुग्णालयातील आया आणि वॉर्डबॉय दोषी असल्याचं आढळून आलं आहे. प्राथमिक चौकशी अहवालात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांवर ठपका ठेवण्यात आला आहे.


असा झाला राजेश यांचा मृत्यू

२८ जानेवारी २൦१८ ला राजेश त्याच्या बहिणीच्या सासूला बघायला नायरमध्ये गेले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांना एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलिंडर आणायला सांगितलं. एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मज्जाव असताना सिलिंडर आत नेण्यास हरकत नसल्याचं वॉर्डबॉयकडून सांगण्यात आलं. त्यामुळे, राजेश सिलिंडर आत घेऊन गेला. पण, आतमध्ये एमआरआय मशीन सुरूच होत्या. आत जाताच सिलिंडरसकट राजेश मारू एमआरआय मशीनमध्ये ओढले गेले आणि सिलिंडरचा व्हॉल्व्ह लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला. त्यावेळी राजेशचा हात एमआरआय मशीनमध्ये अडकला. अचानक हा सर्व प्रकार घडला. अखेर वॉर्डबॉयच्या मदतीने मशीन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आलं आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं, मात्र, उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला.


वॉर्डबॉय आणि आया दोषी

याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने वॉर्डबॉयला निलंबित केलं होतं. याबरोबर डॉक्टर सिद्धांत शाह, वॉर्डबॉय विठ्ठल आणि महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी पूर्ण झाली असून सिलिंडर आत नेण्यापासून वॉर्डबॉय आणि आया यांनी रोखायला हवं होतं. पण तसं न केल्याने वॉर्डबॉय आणि आया दोषी असल्याचं आढळलं आहे.


हेही वाचा - 

राजेश मारूच्या मृत्यूप्रकरणी डॉ. सिद्धांत शहाला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा