राजेश मारूच्या मृत्यूप्रकरणी डॉ. सिद्धांत शहाला अटक


राजेश मारूच्या मृत्यूप्रकरणी डॉ. सिद्धांत शहाला अटक
SHARES

नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून प्राण गमावलेल्या राजेश मारू मृत्यू प्रकरणात चौथ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. सिद्धांत शहा यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. मारूच्या मृत्यूला निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी डॉ. शाह यांना अटक केली. शाह यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.


हलगर्जीपणामुळेच मृत्यू

नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नातेवाईकाच्या मदतीसाठी गेलेला राजेश मारू ऑक्सिजन सिलिंडरसह मशीनमध्ये खेचला गेला आणि त्या मशिनमध्ये सिलिंडर लिकेज झाले. यामुळे राजेशचा गुदमरून मृत्यू झाला.


यापूर्वी कुणाला अटक?

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टर सौरभ लांजेकर, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि अटेंडंट सुनीता सुर्वे यांना अटक केली. या विभागाची जबाबदरी असलेल्या डॉ. सिद्धांत शाह यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

पेशंटसोबत गेला आणि एमआरआय मशिनमध्ये अडकला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा