Advertisement

वरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस


वरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस
SHARES

मुंबईत सरासरी १८० मि. मी. इतका पाऊस पडला असून वरळीत सगळ्यात जास्त ३०३ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने मुंबईकरांना मंगळवारी अक्षरश: झोडपून काढले. 

मुंबईतील पावसाची नोंद करण्यासाठी महापालिकेने एकूण ४८ पर्जन्यमापक यंत्र बसवले आहेत. त्यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात सरासरी १७३.४० मि. मी., पूर्व उपनगरांत सरासरी १९७.३७ मि. मी. तर पश्चिम उपनगरांत सरासरी १९२.७७ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  

मंगळवारी संध्याकाळपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेने ४० मि. मी. तर कुलाबा वेधशाळेने १४० मि. मी एवढ्या पावसाची नोंद केली.


पावसाची सरासरी पुढीलप्रमाणे :

  • ४ ठिकाणी २७५ ते २९९ मि. मी.
  • ३ ठिकाणी २५० ते २७४ मि. मी.
  • १० ठिकाणी २०० ते २५० मि. मी.
  • २० ठिकाणी १५० ते २०० मि.मी.
  • १८ ठिकाणी १२५ मि. मी.
  • ४ ठिकाणी १०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस 


मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पडलेला पाऊस

  • भायखळा : १९५ मि. मी.
  • वडाळा, शीव : २९७.८० मि.मी.
  • वरळी : ३०३ मि.मी.
  • कुर्ला : २८२ मि.मी.
  • अंधेरी : २६२ मि.मी.
  • सांताक्रूझ : २८० मि.मी.


महापालिका कर्मचारी रात्रभर कार्यालयातच

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारीच सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही बहुतांश महापालिका कर्मचारी कार्यालयातच थांबले होते. २६ जुलैचा अनुभव असल्याने कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यालयातच थांबावे असे फर्मान सामान्य प्रशासन विभागाने काढले.  


हे देखील वाचा - 

विक्रोळीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईकर रात्रभर भरकटले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा