Advertisement

12 सप्टेंबरला कोस्टल रोडचा बोस्ट्रिंग आर्क ब्रिज खुला होणार

या वर्षी मार्चमध्ये एका शानदार सोहळ्याने उद्घाटन करण्यात आलेला कोस्टल रोड सुरुवातीला वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत खुला करण्यात आला.

12 सप्टेंबरला कोस्टल रोडचा बोस्ट्रिंग आर्क ब्रिज खुला होणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी वांद्रे (bandra) - वरळी (worli) सी लिंकला जोडलेल्या कोस्टल रोडच्या 'बोस्ट्रिंग' आर्क पुलाचा (broasting arc bridge) एक भाग खुला करणार आहे. तसेच कोस्टल रोडचे उर्वरित काम वर्षअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'बोस्ट्रिंग' आर्क पुलाचे उद्घाटन फार महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर पुल जनतेसाठी खुला केला जाईल.

महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, दक्षिणेकडील पुलाचा भाग गुरुवारी उघडला जाईल. परंतु संध्याकाळी, उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे दक्षिणेकडील पुलाची भाग उत्तरेकडील वाहनांसाठी वापरला जाईल.

या वर्षी मार्चमध्ये एका शानदार सोहळ्याने उद्घाटन करण्यात आलेला कोस्टल रोड सुरुवातीला वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत खुला करण्यात आला. जूनमध्ये, हाजी अलीपर्यंतचा उत्तरेकडील भाग उघडण्यात आला. त्यानंतर एका महिन्यानंतर हाजी अली-वरळी हा मार्ग खुला करण्यात आला.

उत्तरेकडील भाग सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालतो, तर दक्षिणेकडील भाग शनिवार आणि रविवारी बिंदुमाधव ठाकरे चौकातील बंद वगळता आठवडाभर खुला असतो. एकदा संपूर्ण रस्ता पूर्ण झाल्यानंतर महापालिकेची बटरफ्लाय पार्क, सायकलिंग ट्रॅक आणि विहार मार्ग यासह आसपासच्या मोकळ्या जागा विकसित करण्याची योजना आहे.



हेही वाचा

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार

पनवेल : केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना 'या' रुग्णालयात मिळणार मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा