Advertisement

लक्ष द्या! नवी मुंबईत 29 डिसेंबरला पाणीकपात जाहीर

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.

लक्ष द्या! नवी मुंबईत 29 डिसेंबरला पाणीकपात जाहीर
SHARES

नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामे करणे आवश्यक आहे. त्यानुसार शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीकपात होणार आहे. (नवी मुंबई महापालिकेने २९ डिसेंबर रोजी पाणीकपात जाहीर केली)

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडचा पाणीपुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद राहणार असून शनिवार, 30 डिसेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नोंद घ्यावी. (Navi Mumbai Watercut)

त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी तसेच कामोठे, खारघर नोडमधील नागरिकांना या कालावधीत पाण्याचे जतन व वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा

ठाण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा