ठाण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ बॉम्बने उडवण्याची धमकी

28 डिसेंबर रोजी मंदिराला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला.

ठाण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ बॉम्बने उडवण्याची धमकी
SHARES

ठाण्यातील ज्यू धर्मस्थळ असलेल्या गेट ऑफ हेवन सिनेगॉगमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा ईमेल आला आहे. टेंभी नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्त्यांची पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून ज्यू लोक या धार्मिक स्थळी धार्मिक प्रार्थनेसाठी येतात. गुरुवारी मंदिराला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ १ चे उपायुक्त गणेश गावडे, ठाणेनगर, नौपाडा पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दाखल झाले. त्यांनी परिसरातील रस्ते बंद केले आहेत.

नागरिकांनाही येथून ये-जा करण्यास मनाई आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र हलवण्यात येत आहे.



हेही वाचा

सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या इंस्टाग्राम इन्फ्लुअंसरला पोलिसांची तंबी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा