दहिसरमध्ये धोकादायक इमारतीत भाजपाचे कार्यालय

 Dahisar East
दहिसरमध्ये धोकादायक इमारतीत भाजपाचे कार्यालय

दहिसर विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांचे कार्यालय बोरीवली (प.) इथल्या धोकादायक इमारतीत सुरू आहे. पालिकेने नोटीस बजावत संपूर्ण इमारत रिकामी करण्यास सांगितली आहे. पण याच धोकादायक इमारतीत मनिषा चौधरी यांचे कार्यालय असून ते अजूनही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनिषा चौधरी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. बोरीवली (प.) इथल्या सोडावाला लेन रोशननगरमधल्या मोतीलाल इमारतीत मनिषा चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. ही 4 मजली इमारत पडीक असल्याने पालिकेने ती रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली होती. संपूर्ण इमारत रिकामी झालेली असताना देखील याच इमारतीत मनिषा चौधरींचं कार्यालय मात्र सुरूच आहे.काहींच्या म्हणण्याप्रमाणे राजकारणात त्यांची मोठी पकड असल्याने त्यांचे कार्यालय अद्याप तिथेच सुरू आहे. तर आपले दुसरे कार्यालय देखील आहे. मात्र त्याबद्दल जनतेला माहीत नसल्याने आपण इथेच कार्यालय सुरू ठेवले आहे, असं स्पष्टीकरण मनिषा चौधरी यांनी दिलं आहे.

Loading Comments