Advertisement

लाॅकडाऊनमध्ये खासगी कार्यालये बंद, 'ही' कार्यालयं असतील सुरू

राज्यात २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन नियमांनुसार, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार आहेत.

लाॅकडाऊनमध्ये खासगी कार्यालये बंद, 'ही' कार्यालयं असतील सुरू
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले आहे. सरकारने लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात  २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन नियमांनुसार, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार आहेत. तसंच सर्व खाजगी कार्यालये बंदच असतील. तर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती असेल. 

शासकीय कार्यालयांसंबंधी नियम

- शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती १५ टक्के असेल

- शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल.

- आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल.

- कार्यालयांतील बैठका ऑनलाईन घ्याव्यात.

-  फक्त कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

खालील कार्यालयं ही अपवादात्मक श्रेणीमध्ये असतील

- केंद्रीय, राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय, त्यांचे प्राधिकरण आणि संघटन सहकारी, 

- रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.

- सार्वजनिक युनिट आणि खाजगी बँक 

- आवश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कार्यालय 

- विमा मेडिक्लेम कंपन्या 

- उत्पादन /वितरण व्यवस्थेमध्ये असणारे औषधी कंपन्यांचे कार्यालय

- सर्व गैर-बँकिंग वित्तीय महामंडळ

- सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था

- प्राधिकरण आयोगांच्या सुनावणी चालू असेल तर त्या वकिलांचे कार्यालय.

- हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा.

- दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक.

- इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनं

-  ई कॉमर्स, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.

- वृत्तपत्रे छपाई आणि वितरण  सुरू हेही वाचा -

लॉकडाउनमध्ये नोकरी नाही? घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा