Advertisement

लॉकडाउनमध्ये नोकरी नाही? घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल

काहीजण घरात बसून काम शोधत आहेत. तर काही जण रिकाम्या वेळेत पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही घरबसल्या उत्पन्न कसं मिळवता येईल हे सांगणार आहेत.

लॉकडाउनमध्ये नोकरी नाही? घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल
SHARES

कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. तर कडक निर्बंधांमुळे अनेक लोक घरात अडकून पडले आहेत. काहीजण घरात बसून काम शोधत आहेत. तर काही जण रिकाम्या वेळेत पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही घरबसल्या उत्पन्न कसं मिळवता येईल हे सांगणार आहेत. 

डिलिव्हरी व्यवसाय

कोरोनाच्या काळात  डिलिव्हरी (वितरण) व्यवसायात मोठी तेजी आली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय, ऑनलाइन खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या कंपन्यांचा व्यवसाय मोठा वाढला आहे. अशा परिस्थितीत डोर स्टेप डिलिव्हरी व्यवसाय स्थानिक पातळीवर सुरू करता येईल. हा व्यवसाय सेवा आणि डिलिव्हरी संबंधित असू शकतो. यामध्ये किराणा, औषधी यासारखी उत्पादनांची  डिलिव्हरी घरपोच दिली जाऊ शकते.

टिफिन व्यवसाय

सरकारने रेस्टॉरंटमध्ये खाण्या-पिण्यास बंदी घातली आहे. पण ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर बंदी नाही. अशा परिस्थितीत टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करता येईल. शहरातील तरुण मोठ्या प्रमाणात बाहेरील खातात. त्यामुळे हा व्यवसाय चांगला चालू शकतो.  जर तुम्ही काही क्लायंट तयार केले तर यामधून हजारो रुपये सहज मिळवता येतील. या व्यवसायासाठी फारशा गुंतवणुकीची आवश्यकता नाही.

ऑनलाईन शिकवणी वर्ग

कोरोना कालावधीत शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू करता येतील. ज्या विषयावर आपलं प्रभुत्व आहे तो विषय आपण शिकवू शकता. यासाठी लॅपटॉप व इंटरनेट कनेक्शन आवश्यक असेल. सध्या सर्व मुले केवळ ऑनलाइन वर्गांचा लाभ घेत आहेत.

युट्यूब 

कोरोनामध्ये डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  अशा परिस्थितीत यूट्यूबर लोकांची चांगली चलती आहे.  जर आपण एखाद्या कामात कुशल असाल तर लोकांसमोर या आणि भरपूर पैसे मिळवा. जेवढे तुमचे सब्सक्राइबर्स जास्त तेवढी जास्त कमाई असेल. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा