Advertisement

गडकिल्ल्यांवर थर्टी फर्स्ट पार्टीला बंदी, ग्रामस्थांचा निर्णय

तळीरांमांना गडकिल्ल्यावर पार्टी करण्यासाठी वन विभागानं बंदी घालण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनीच काही किल्ल्यांवर 'बंदी'चे शस्त्र उगारले आहे.

गडकिल्ल्यांवर थर्टी फर्स्ट पार्टीला बंदी, ग्रामस्थांचा निर्णय
SHARES

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 31st पार्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. काहींना पर्यटनस्थळी जाऊन 31st साजरा करायचा बेत आखला असून काहींना नववर्षाच्या स्वागताला पार्टीसाठी टेकड्यांवर, वनक्षेत्रात किंवा गडकिल्ल्यांवर जाण्याचा बेत आखला आहे. परंतु, तळीरांमांना गडकिल्ल्यावर पार्टी करण्यासाठी वन विभागानं बंदी घालण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनीच काही किल्ल्यांवर 'बंदी'चे शस्त्र उगारले आहे.

रात्रभर धांगडधिंगा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल, रिसॉर्टमध्ये जाण्याऐवजी जंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये तंबू ठोकून कोणत्याही बंधनाशिवाय रात्रभर धांगडधिंगा घालण्याची मानसिकता वाढते आहे. यात दारू पार्ट्यांचं प्रमाण अधिक आहे. २-३ वर्षांपासून अनेक इव्हेंट कंपन्यांकडून गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, मोकळ्या माळरानांवर 'थर्टी फर्स्ट'च्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे.

संमिश्र प्रतिक्रिया

अशा ठिकाणी पार्ट्या करून पर्यटकांनी इथंच कचरा आणि दारूच्या बाटल्या फेकल्याचं याआधी आढळून आलं आहे. त्यामुळं गड-किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक तळीरामांना ग्रामस्थांसह गडप्रेमी तरुणांनी फटकावल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटल्या. त्यामुळं हे प्रकार टाळण्यासाठी आधीच बंदी घालणं उत्तम असं अनेकांचं म्हणणं आहे.

किल्ले बंद

'नववर्षाच्या पूर्वसंध्येला हरिश्चंद्रगड, माहुली, प्रबळमाची आदी किल्ले बंद करण्यात येणार असून कृपया कोणीही २ दिवस या किल्ल्यांच्या आजूबाजूला फिरकू नये', अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. किल्ले परिसरात होणाऱ्या मद्य पार्ट्यांना लगाम घालण्यासाठी ग्रामस्थांनी हे पाऊल उचलल्याचं समजतं. हरिश्चंद्रगडावरील ग्रामस्थांनी आपली भूमिका जाहीर केली असून प्रबळगड, माहुलीगडावरील ग्रामस्थ देखील लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचं कळतं.



हेही वाचा -

ढगाळ वातावरणामुळं मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम

चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा