Advertisement

मास्क न घालणाऱ्यांना रस्त्यावर मारावा लागला झाडू

२०० रुपयांचा दंड तर मास्क न घालणाऱ्यांकडून आकारला जातोच आहे. शिवाय त्यांना रस्त्यावर झाडू मारण्याची शिक्षा केली जातेय.

मास्क न घालणाऱ्यांना रस्त्यावर मारावा लागला झाडू
SHARES

बृहन्मुंबई महानगर पालिके (BMC)नं मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. २०० रुपयांचा दंड तर मास्क न घालणाऱ्यांकडून आकारला जातोच आहे. शिवाय त्यांना रस्त्यावर झाडू मारण्याची शिक्षा केली जातेय. मुंबईमध्ये एपेडेमिक अॅक्ट लागू होईपर्यंत मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.

BMC च्या अधिकाऱ्यांनी अंधेरी पश्चिम, जुहू आणि वर्सोवा परिसरात मास्क न घालणाऱ्यांकडून एक तास रस्त्यावर झाडू मारुन घेतला. के-वेस्ट वार्डचे सहाय्यक निगम आयुक्त विश्वास मोटे यांनी म्हटले की, मास्क न घालणे आणि अधिकाऱ्यांसोबत वाद घालणे किंवा दंड भरण्यास नकार देणाऱ्या लोकांकडून आम्ही सामुहिक सेवानुसार झाडू मारून घेतला.

GRP विषयी लोकल ट्रेन आणि स्टेशनवर मास्क न घालणाऱ्या लोकांना दंड लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टेट डिजास्टर मॅनेजमेंटचे डायरेक्टर अभय यावलकर यांनी या संबंधात GRP कमिश्नर रवींद्र शेनगांवकर यांना पत्र लिहिलं आहे.

गुरुवारी राज्यात ५ हजार ९०२ नागरिक संक्रमित आढळून आली आहेत. यासोबतच रुग्णांचा आकडा वाढून १६ लाख ६६ हजार ६६८ झाला आहे. यापैकी १ लाख २७ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संक्रमणामुळे राज्यात आतापर्यंत ४३ हजार ७१० लोकांचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

मुंबईत १५ हजार जागांसाठी ९९ हजार फेरीवाल्यांचे अर्ज

संबंधित विषय