Advertisement

पावसामुळं साथीचे आजार वाढण्याचा धोका

एकीकडं कोरोना तर दुसरीकडं साथीच्या आजारांनी मुंबईकरांचं जगणं कठीण झालं आहे.

पावसामुळं साथीचे आजार वाढण्याचा धोका
SHARES

एकीकडं कोरोना तर दुसरीकडं साथीच्या आजारांनी मुंबईकरांचं जगणं कठीण झालं आहे. मुसळधार पाऊस ही आनंदवार्ता असली तरी, या पावसात साथीच्या आजारांचा मुंबईकरांना सामना करावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, मलेरिया, डेंग्यूच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. साचलेल्या पाण्याची डबकी, कचरा, अस्वच्छता यामुळं डेंग्यूच्या आजाराची शक्यता वाढली आहे.

राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण असून, गेल्या ४ महिन्यांत ५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात ३६ रुग्ण असून, हजारापेक्षा जास्त संशयित आहेत. विदर्भात ३६८ रुग्ण आढळले असून, ३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

नागपूरमध्ये १९४, यवतमाळमध्ये ६७, वर्धा येथे ४९, अमरावतीत २५०, चंद्रपूरमध्ये २२, बुलडाणा येथे ७, भंडाऱ्यात ४ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. मराठवाड्यात डेंग्यूचे ११० रुग्ण गेल्या काही महिन्यांत आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६८ रुग्ण नांदेड जिल्ह्यात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१, औरंगाबाद जिल्ह्यात १३, परभणी जिल्ह्यात ४ तर बीड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात १२४, सांगलीत १२ तर सातारा येथे ९२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये २ तर सिंधुदुर्गमध्ये ६९ रुग्णांची नोंद झाली असून, ठाण्यात १७ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्ण दगावले आहेत. नाशिकमध्ये डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचेही ११७ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही तिन्ही बालके आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा