Advertisement

बळीराजाचं लाल वादळं मुंबईच्या दिशेनं...

. ७ मार्चला नाशिकमधून सुरू झोलल्या या लाॅन्ग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत. सध्या हा मोर्चा भिवंडीत पोहचला असून शनिवार रात्रीपर्यंत ठाण्यात तर रविवारी मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर सोमवारी, १२ मार्चला दुपारी १२ च्या दरम्यान हे लाल वादळ विधानसभेला आपल्या विळख्यात घेणार आहे.

बळीराजाचं लाल वादळं मुंबईच्या दिशेनं...
SHARES

नाशिक ते मुंबई असं तब्बल १६५ किमीचं अंतर पायी पार करत निघालेलं बळीराजाचं लाल वादळं मुंबईच्या वेशीजवळ येऊन धडकलं आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव, विनाअट कर्जमुक्ती अशा एक ना अनेक मागण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लाॅन्ग मार्चचं आयोजन केलं आहे. ७ मार्चला नाशिकमधून सुरू झोलल्या या लाॅन्ग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत. सध्या हा मोर्चा भिवंडीत पोहचला असून शनिवार रात्रीपर्यंत ठाण्यात तर रविवारी मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर सोमवारी, १२ मार्चला दुपारी १२ च्या दरम्यान हे लाल वादळ विधानसभेला आपल्या विळख्यात घेणार आहे.




या लाॅन्ग मोर्चामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. हा लाॅन्ग मार्च रात्री ८ वाजेदरम्यान मुलुंड जकातनाक्यावर मुक्काम करणार असून सकाळी सायनच्या दिशेने निघणार अाहे, अशी माहिती किसान सभेचे प्रसाद सुब्रमण्यम यांनी दिली.


काय आहेत मागण्या?

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करावी, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेतीला समृद्ध करावं, शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्यावी, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

आपल्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे सरकार दरबारी संघर्ष सुरू आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या पदरी निराशच पडत असल्यानं आता शेतकऱ्यांनी 'करो या मरो'ची हाक देत या लाॅन्ग मार्चचं आयोजन केलं आहे.


मनसेचा पाठिंबा

या लाॅन्ग मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पाठिंबा जाहीर आहे. किसान लॉँग मार्च वेशीवर आल्यावर ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांची भेट घेतली आणि राज ठाकरे यांना फोन लावून दिला. त्यानंतर राज यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं.

'गुजरातसाठी धरण, शेतकऱ्यांना मात्र मरण', 'जमीनं आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची', अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकरी नाशिकवरून ७ मार्चला निघाले आहेत. राज्याच्या कानाकोपर्यातून या लाॅन्ग मार्चमध्ये सहभागी झालेले हे शेतकरी सोमवारी विधानभवनाला घेराव घालणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.


तोपर्यंत मुंबई सोडणार नाही

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस, लेखी आश्वासन दिलं जात नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा इशारा किसान सभेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता सोमवारी हे लाल वादळ मुंबईत काय कमाल दाखवतं, याकडेचं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा