Advertisement

मातोश्रीवरील 3 पोलिस शिपायांना कोरोना


मातोश्रीवरील 3 पोलिस शिपायांना कोरोना
SHARES
महाराष्ट्राचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर मातोश्रीच्या सुरक्षेस असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. माञ आता कोरोनाने मातोश्रीत प्रवेश केला आहे असे म्हटंले तर चुकीचे ठरणार नाही,कारण मातोश्रीच्या सुरक्षेस असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे पुढे आले आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील 'मातोश्री' निवासस्थानाजवळ असलेल्या चहा विक्रेत्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या चहावाल्यावर जोगेश्वरी येथील हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे याच चहा वाल्याकडे ठाकरेंच्या बंगल्यावर असलेले सुरक्षा रक्षक चहा पिण्यासाठी गर्दी करायचे.  चहा वाल्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह   आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्यांची शोध सुरू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाकरेंच्या सुरक्षेस असलेल्या 170 जणांना  वांद्रे (पूर्व) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.या सुरक्षा रक्षकांचे रिपोर्ट आज हाथी आले असून ते निगेटिव्ह आहेत. माञ तरी ही या सर्वांना काही दिवसांसाठी होम क्वारन्टाईन केले. 

या सर्व घडीमोडी घडून काही दिवस होत नाही. तोच मातोश्रीवर बंदोबस्तास असलेल्या तीन पोलिस शिपायांना कोरोनाची लागन झाल्याचे आता पुढे आले आहे. उद्धव ठाकरेंच्या घराजवळ पोहचलेल्या कोरोनाने आता थेट त्यांच्या घरात प्रवेश केला आहे असे म्हटंल्यास चुकीचे ठरणार नाही. या तीन ही पोलिसांनी सांताक्रूझ जवळील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या प्रकारानंतर उद्धव ठाकरेंनी ही स्वत:ची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे त्यांची गाडी स्वत:च चालवत असून त्या गाडीत इतर कुणी ही नसते. काही दिवसांपूर्वीच त्याचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा