Advertisement

लॉकडाऊनमध्येही आंबा खरेदी शक्य, वाया पोर्टल आंबा थेट तुमच्या घरी

आंब्याची ही देवघेव उत्पादक आणि ग्राहक अशा दुहेरी पद्धतीनं ऑनलाइनमार्गे करता येईल.

लॉकडाऊनमध्येही आंबा खरेदी शक्य, वाया पोर्टल आंबा थेट तुमच्या घरी
SHARES

आंब्याचा हंगाम आता सुरू झाला असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही ग्राहकांपर्यंत फळांचा राजा पोहोचण्याचा मार्ग कृषी पणन मंडळानं उपलब्ध केला आहे. आंब्याची ही देवघेव उत्पादक आणि ग्राहक अशा दुहेरी पद्धतीनं ऑनलाइनमार्गे करता येईल.


आंबा थेट तुमच्या घरी

कोकणातील उत्पादकांद्वारे हापूस आंबा शहरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी आंबा महोत्सव घेते. तथापि, यंदा कोरोनाच्या प्रकोपामुळे महोत्सवाचे आयोजन अशक्य आहे. उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसंच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावं लागू नये याकरिता एक योजना आखली आहे. 


'या' ऑनलाइन पोर्टलवर करा नोंदणी

उत्पादक ते ग्राहक या दोघांनीही ऑनलाइन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळाला Buyer Seller Information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


पोर्टलवर ही सुविधा...

या पोर्टलवर देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू आहे. आंबा उत्पादकांचं नाव, संपर्क क्रमांक, कोणत्या प्रजातीचा आंबा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे, मुंबई तसंच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी नोंदवता येईल.

खरेदीसाठी मर्यादा

गुलटेकडी इथल्या वखार महामंडळाचे गोदाम तात्पुरते साठवणुकीची व्यवस्था म्हणून उपलब्ध केले आहे. आंबा खरेदीकरिता किमान मर्यादा १०० डझन असणार आहे. तसेच आंबा थेट सोसायटीमध्ये पोहोचवता यावा यासाठी वाहन व्यवस्थादेखील उपलब्ध आहे. या सुविधेसाठी ग्राहकांनी कृषी पणन मंडळाच्या पोर्टलवरील माहितीद्वारे खरेदीदार म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर आपली मागणी एकत्रित नोंदवावी अथवा आंबा उत्पादकांशी संपर्क करून खरेदीसाठी मागणी नोंदवावी, असं आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आलं आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा