Advertisement

वांद्रे रेल्वे स्थानकात टीसीची प्रवाशाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीसी निलंबित


वांद्रे रेल्वे स्थानकात टीसीची प्रवाशाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीसी निलंबित
SHARES

वांद्रे रेल्वे स्थानकात  टीसीने प्रवाशाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टीसीविरोधात संतप्त वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पश्चिम रेल्वेने टीसी दीपक राणे (५०) याला निलंबित केलं आहे. 


मित्राने काढला व्हिडिओ

शनिवारी वांद्रे स्थानकात प्रवाशांची तिकिटे तपासत असताना टीसी दीपक राणे याने प्रतीक शेंडगे (२३) या प्रवाशाकडे तिकिट मागितलं. प्रतिकने त्याच्याकडील पास राणेला दाखवला. मात्र, पासवर शिक्का नाही त्यामुळे तुला दंड भरावा लागेल, असं राणेने प्रतिकला सांगितलं. पास असूनही दंड का भरू असं म्हणत प्रतिकने दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या राणेने त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

मारहाणीची ही घटना प्रतिकच्या एका मित्राने मोबाइलमध्ये कैद केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी टीसीची ही अरेरावी पाहून नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. या गंभीर घटनेची दखल घेत पश्चिम रेल्वेने दीपक राणे याला तात्काळ निलंबित केलं आहे.हेही वाचा  -

अनुराग कश्यपच्या मुलीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट, ओशिवरा पोलिसात गुन्हा

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement