मुंबईची टिकटिक निवृत्त होतेय!

सीएसटी - कायम घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई. अशा 22 घड्याळांची टिकटिक मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर 24 तास सुरु असते. पण या घड्याळांनाच स्वत:च्या इशाऱ्यावर धावायला लावणारा अवलिया म्हणजे बंडू जाधव. बंडू जाधव मध्य रेल्वेच्या सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात कार्यरत आहेत. मुंबई सीएसटी इमारतीच्या मुख्य टॉवरवर असलेलं हे 14 फूट आणि 150 वर्ष जुनं हेरिटेज दर्जाचं घड्याळ म्हणजे बंडू जाधवांचा चालता बोलता जोडीदारच. हे घड्याळ अजूनही चावीवर चालतं. आणि ही चावी अर्थातच बंडू जाधव यांच्या हातात असते. पण मार्च महिन्यात बंडू जाधव ही चावी सोडतायत, अर्थात ते निवृत्त होतायत.

Loading Comments