Advertisement

ठाण्यातील दुकानदारांना दिलासा, दुकानांसाठी वेळ वाढवली

याआधी महापालिका क्षेत्रातील हॉटेल, फुड कोर्ट, उपाहारगृहे आणि मद्यालये यांना रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती.

ठाण्यातील दुकानदारांना दिलासा, दुकानांसाठी वेळ वाढवली
SHARES

ठाणे शहरातील दुकाने, बाजारपेठा आणि भाजीमंडई यांना सकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचा निर्णय मंगळवारी पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे दसरा आणि दिवाळी सणाच्या तोंडावर व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

याआधी महापालिका क्षेत्रातील हॉटेल, फुड कोर्ट, उपाहारगृहे आणि मद्यालये यांना रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने दुकाने, बाजारपेठा आणि भाजीमंडई रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा  निर्णय घेतला.  ठाण्यातील सर्व दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता.

ठाणेकर नागरिक व व्यापाऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या मागण्यांमुळे अटी व शर्तींच्या अधिन राहून टप्प्याटप्प्याने दुकाने सुरू करणेबाबत परवानगी देण्यात आली आहे. परंतु सायंकाळी ७ वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिकेकडून लागू करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. व्यापाऱ्यांकडून तसेच, राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून व्यापाऱ्यांना वाढीव वेळ देण्याची मागणी होत होती.

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची सोमवारी भेट घेतली. यावेळी महापौरांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी देण्यासंदर्भात चर्चा केली.

 

हेही वाचा

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा