Advertisement

लस घेतली नाही तर पगार नाही, ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

आयुक्त डॉ विपिन शर्मा आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासह TMC वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लस घेतली नाही तर पगार नाही, ठाणे महानगरपालिकेचा निर्णय
SHARES

ठाणे महानगरपालिकेनं (TMC) म्हटलं आहे की, ज्या कर्मचाऱ्यांनी कोविड-19 प्रतिबंध लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांना वेतन दिलं जाणार नाही. आयुक्त डॉ विपिन शर्मा आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासह TMC वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, ज्या नागरी कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला नाही, त्यांना पगार दिला जाणार नाही.

ज्या नागरी कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस निर्धारित कालावधीत घेतला नाही, त्यांनाही त्यांचं वेतन मिळणार नाही, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. TMC ने सर्व प्रशासकिय कर्मचार्‍यांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र त्यांच्या संबंधित कार्यालयात सादर करणं अनिवार्य केलं आहे.

महिन्याच्या अखेरीस शहरात शतप्रतिशत लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचं म्हस्के यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शतप्रतिशत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मंगळवारपासून मुंबईला लागून असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

महापौरांनी लक्ष्य साध्य करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मागितले आणि लसीकरण करण्याचे आवाहन केले . ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनी दुसरा डोस घ्यावा. TMC नं 'ऑन-व्हील' लसीकरण सुविधा आणि जंबो लसीकरण केंद्रांसह विविध लसीकरण केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत.

'हर घर दस्तक' कार्यक्रमांतर्गत, आरोग्य कर्मचारी, आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते) कर्मचारी आणि परिचारिका घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांचा तपशील गोळा करतील. अशा लोकांना लस देण्यात येतील, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. यासाठी एकूण १६७ टीम तयार करण्यात आल्या आहेत.

कळवा इथल्या नागरीक संचालित छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रूग्णालयात रूग्णांसह जाणाऱ्यांनी पूर्ण लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. ज्यांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेलं नाही, त्यांना डोस देण्यात येतील, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आलं आहे.

विद्यार्थी त्यांच्या पालकांना लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल संदेश पाठवतील, असं प्रकाशनात म्हटलं आहे. शहरातील कचरा गोळा करणारी वाहनं देखील लसीकरणाचे महत्त्व सांगतील, असंही त्यात म्हटलं आहे.

शहरातील कोविड-19 चे रुग्ण कमी होत आहेत हे एक चांगले लक्षण आहे, मात्र संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्यावर मेगा लसीकरण मोहीम हा एकमेव उपाय असल्याचं महापौर म्हणाले.

रविवारी ठाणे जिल्ह्यात ११८ नवीन कोरोनाव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामुळे संसर्गाची संख्या 5,66,749 वर पोहोचली, तर अधिकृत आकडेवारीनुसार एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11,543 वर पोहोचला.हेही वाचा

सुईविनाच होणार लहान मुलांचं लसीकरण

चौथ्या दिवशीही महाराष्ट्रात १००० हून कमी रुग्णांची नोंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा