Advertisement

मास्क न घालणाऱ्यांवर ठाणे पालिकेची कारवाई, नऊ लाखांचा दंड वसूल

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नारिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा असं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचं आढळून येत आहे.

मास्क न घालणाऱ्यांवर ठाणे पालिकेची कारवाई, नऊ लाखांचा दंड वसूल
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नारिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा असं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचं आढळून येत आहे. अशा नागरिकांवर ठाणे महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.  मास्क न घालणाऱ्या १९०० नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला आहे. या दंडाची एकूण रक्कम साडे नऊ लाख रुपये आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच बाजारात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले होते. तसे अधिकार सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांना देखील देण्यात आले आहेत. मागील तीन आठवड्यापासून 

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये मास्क न घालणाऱ्या १९०० व्यक्तींविरूद्ध कारवाई करून ९ लाख ५० हजारांचा दंड वसूल वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक विना मास्क व्यक्ती नौपाडा प्रभाग समिती आढळल्या असून, सर्वात कमी कारवाई वागळे प्रभाग समिती करण्यात आली आहे.



हेही वाचा -

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा