Advertisement

माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही

मुंबईत शनिवारी पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही
SHARES

मुंबईत शनिवारी पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. जी उत्तर विभागातील माहिम परिसरात जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून, जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करत आहेत.

जलवहिनी फुटल्यामुळं जी उत्तर विभागाच्या माहिम, दादर, प्रभादेवी, शिवजी पार्क, एल्फिन्स्टन परिसरात पाणी येणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, जनरल अरुण कुमार वैद्य रोड माहीम येथे पाण्याची लाईन फुठल्यामुळे संध्याकाळी ४ ते ७ या कालावधीत येणारे दादर प्रभादेवी एलफिस्टन येथे पाणी येणार नाही तसेच सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत असणारे शिवाजी पार्क, माहीम येथे पाणी येणार नाही. जर पाण्याच्या लाईनचे काम लवकर झाले तर रात्री पाणी येण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय