Advertisement

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी


सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी
SHARES

सर्वात श्रीमंत व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) समोर उभ्या असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या भव्य इमारतीचे आता सर्वसामान्य नागरिकांनाही दर्शन घडणार आहे. मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करणाऱ्या पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. गॉथिक शैलीतील १५० वर्षांंच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा लवकच उलगडलाणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ही ‘हेरिटेज सफर’ करता येणार आहे.  

या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी गेल्या वर्षी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गुरुवार २८ जानेवारीपासून प्रत्यक्षात ही पुरातन वास्तू पर्यटनासाठी खुली होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा