बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन

 Santacruz
बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन
बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन
See all

सांताक्रुझ - लहान मुलांसाठी खूशखबर आहे. रोटरी क्लब उद्यानामध्ये लवकरच टॉय ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मिनी ट्रेन नादुरुस्त अवस्थेत होती. त्यामुळे उद्यानात खेळायला येणाऱ्या मुलांचा हिरमोड व्हायचा. त्यामुळे वीजेवर चालणारी मिनी ट्रेन खरेदी करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय.'मिनी ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या मैदानांमध्ये ही मिनी ट्रेन धावेल. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आलीय,' अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी दिली. ही मुंबईच्या उद्यानामधील पहिली टॉय ट्रेन ठरेल.

 

 

Loading Comments