Advertisement

ठाण्यातील तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडी सुटणार

आनंदनगर ते साकेतदरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून 8.24 किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याचे काम हाती घेत आहे. ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

ठाण्यातील तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडी सुटणार
SHARES

ठाण्यातील (thane) तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाड्यातील गोल्डन डायज जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने (MMRDA) आनंदनगर ते साकेतदरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून 8.24 किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याचे काम हाती घेत आहे. ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

सध्या ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील (Eastern express highway) तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाड्यातील गोल्डन डायज जंक्शन येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते.

विलंब होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाडा येथे सहा-लेनचे उड्डाणपूल असले तरी, तिथे ये-जा करणारी वाहतूक आणि विविध सर्व्हिस रोड्स व स्लिप रोड मुख्य रस्त्यात मिसळतात.

या कोंडीपासून दिलासा देण्यासाठी 8.24 किमीचा उन्नत मार्ग (elevated corridor) उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.

विशेषत: माजीवाडा जंक्शन मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा महत्त्वाचा दुवा असल्याने, हा पूल ठाण्यातील स्थानिक वाहतुकीसह मुंबई (mumbai)–नाशिक ते गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचीही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल.

हा एलिवेटेड कॉरिडोर आनंदनगर येथे चेडानगर-आनंदनगर उड्डाणपुलाच्या लँडिंगपासून सुरू होईल आणि ठाण्यातील सर्व गजबजलेल्या चौकांवरून जात साकेत, ठाणे (पश्चिम) येथे उतरेल.

हा उन्नत मार्ग सहा लेनचा असेल आणि दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी सोडवण्याचे उद्देश्य आहे. प्रत्येक बाजूस तीन लेन असतील.

रस्त्याची एकूण लांबी 8.24 किमी इतकी असणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाचा एकूण खर्च 1,847.72 कोटी रुपये इतका असणार आहे.

आता या मार्गाचे काम सुरू झाले आहे. तसेच सध्या पाइल, पिअर आणि पाइल कॅपचे काम सुरू आहे. 48 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

त्यापैकी 36 महिने प्रत्यक्ष बांधकामासाठी ठेवण्यात आले आहेत. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.



हेही वाचा

मुंबईच्या एक तृतीयांश भागात सार्वजनिक वाहतुकीची कमतरता

पसंतीचे घर निवडण्याची सिडकोची योजना

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा