Advertisement

माळशेज घाट सुरूच राहणार! वाहतूक बंदचा निर्णय मागे

माळशेज घाटातील वाहतूक बदल आता रद्द करण्यात आले आहेत.

माळशेज घाट सुरूच राहणार! वाहतूक बंदचा निर्णय मागे
SHARES

माळशेज घाट हा मुंबईतील नागरिकांना किंवा पुणे,अहमदनगरमार्गे जाणाऱ्या नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे.त्यामुळे माळशेज घाटातून अनेक प्रवाशी ये- जा करतात. मात्र हा माळशेज घाट दर गुरुवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्त्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार होता. परंतु हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. माळशेज घाटातील वाहतूक बदल आता रद्द करण्यात आले आहेत.

माळशेज घाटातील काँक्रिटीकरण आणि दुरुस्ती कामासाठी दर गुरुवारी सकाळी ६ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले होते.

पर्यायी वाहतूक व्यवस्था ही कल्याण- माळशेज घाट खुबी करंजाळे खिरेश्वर ते कोल्हेवाडी-सागनोरे, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी,कोळवाडी ओतूर ते आळेफाटा- अहमदनगर अशी करण्यात आली होती. तसे पत्र या उपविभागाचे होते.

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सुधारित सूचना येईपर्यंत महामार्ग वाहतुकीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच या महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनासाठी वाहतूक चालू राहील अशी सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यतात आली आहे.



हेही वाचा

नेरुळमधील वंडर्स पार्कची एन्ट्री फी वाढली, नवे तिकिट दर पहा

मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना कारावा लागण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा