Advertisement

ट्राफिक पोलिसांची गांधीगिरी, नियम तोडणाऱ्यांना दिलं गुलाबाचं फुल

धारावी आणि माहीममध्ये ट्राफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना लाल गुलाब देण्यात आले.

ट्राफिक पोलिसांची गांधीगिरी, नियम तोडणाऱ्यांना दिलं गुलाबाचं फुल
SHARES

धारावी आणि माहीममध्ये ट्राफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना लाल गुलाब देण्यात आले. समाजसेवक, रहिवाशी आणि ट्राफिक पोलिसांनी या उपक्रमात सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा मासिक कार्यक्रमाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्याता आला होता.

उल्लंघन करणार्‍यांना गुलाबाचं फुल गेऊन सीट बेल्ट आणि हेल्मेट घालण्यासह सर्व योग्य सुरक्षा नियमांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला. जनजागृती करण्यासाठी ट्रॅफिक कॉन्स्टेबलसमवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी फलक आणि गुलाब ठेवलेले होते.

“ट्रॅफिक उल्लंघन करणार्‍यांना, मुख्यत: हेल्मेट न घातलेले चालक आणि सीट बेल्टविनावाहन चालवणाऱ्यांना अडवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गुलाब दिलं. यासोबतच त्यांना हेल्मेट घालण्याची आणि सुरक्षा नियमांचं पालन करण्याची विनंती केली, ”असे सहभागी अधिका-यानं सांगितलं.

माहीम वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद कुराडे म्हणाले, “या मोहिमेमध्ये ८ कॉन्स्टेबल आणि ३ अधिकारी सहभागी झाले होते. आम्ही सुमारे १२५ उल्लंघन करणार्‍यांना पकडलं. काहींनी हेल्मेट तर काहींनी सीट बेल्ट लावला नव्हता. आम्ही त्यांना सल्ला दिला आणि त्यापैकी कोणालाही दंड ठोठावण्यात आला नाही.”



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा